श्री लक्ष्मीकेशव देव प्रसन्न

प्रस्तुत श्री विष्णूचे देवस्थान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील श्री गणपतीपुळे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून २१ कि. मी. अंतरावरील कोळिसरे गावात आहे. मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची असून मूर्तीची उंची ५ फूट, ५ इंच व रुंदी २७ इंच इतकी आहे. मध्ययुगात ,कोल्हापूर येथील रंकाळा तलावात ही श्रींची मूर्ती पाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने ठेवली गेली होती. कालांतराने कोणा एका सज्जनास ती श्रींची मूर्ती तेथून दुसरीकडे स्थापित करण्याकरिता स्वप्नात दृष्टांत झाला. त्यानुसार मूर्ती रंकाळ्याहून कोकणात नेत असताना कोळिसरे या ठिकाणी स्थापित झाली. अशी आख्यायिका आहे.

मंदिराच्या परिसरात श्री रत्नेश्वर आणि श्री हनुमान यांची सुंदर मंदिरे आहेत . मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात असलेली घनदाट हिरवी झाडी आणि अखंड वाहणारा पाण्याचा झरा (तीर्थ ) परिसर रम्य करतात . शांत, शुद्ध आणि रम्य अश्या या ठिकाणी दैवी शक्ती आणि निसर्ग यांचा मेळ पाहून मन आनंदमय होऊन जात. आत्मिक सुखाची जणू प्रचितीच मिळते .

पुढे वाचा

मंदिराचे वेळापत्रक

  • मंदिराच्या वेळा (दररोज) – स. ८.०० ते दु. १.३० आणि सं. ५.३० ते रा ७.००
  • पवमान अभिषेक/ नित्य पूजा – स. ८.०० ते स. ९ .००
  • (इतर अभिषेक - स. ९.00 ते स. १२.00 )
  • महानैवेद्य आरती – दु. १२.३० ते १.००
  • दर्शन - सं. ५.३० ते रा ७.००
  • (टीप : दुपारी १.३० ते संद्याकाळी ५.३० मंदिर बंद असते. )

देवस्थानचे उत्सव

श्री लक्ष्मीकेशव देवतेचा वार्षिक उत्सव दरवर्षी कार्तिक शुक्ल दशमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात साजरा केला जातो . या उत्सव काळात सकाळी अभिषेक, महापूजा, मंत्रपुष्प, रात्री आरत्या, भोवत्या, छबिना, कीर्तन तसेच समाप्तीचे दिवशी सकाळी श्री कृष्ण लीलांचे कीर्तन, पारंपारिक खेळ, दहीकाला, दुपारी महाप्रसाद, रात्री ललीताख्यानाचे कीर्तन, ललित नाट्यप्रयोग त्यानंतर उत्सव समाप्ती , महा प्रसाद केला जातो. तसेच श्रावण महिन्यात कुलोपासकांकडून भजनाचा विशेष कार्यक्रम केला जातो. त्यास एक्का असेही म्हणतात. हा कार्यक्रम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यन्त संपन्न केला जातो.

उपलब्ध सेवा

  • वार्षिक अभिषेक सेवा : दर महिन्यात एक दिवस अभिषेक
  • विशिष्ट अभिषेक सेवा : दर वर्षी सांगितलेल्या विशिष्ट दिवशी अभिषेक.
  • अन्नदान सेवा
  • अभिषेक
  • नंदादीप सेवा